मोफत व्यवसायिक प्रशिक्षण

| रायगड | वार्ताहर |

रायगड जिल्हा पोलिस दल आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील बेरोजगार युवक – युवती करिता विनामूल्य व्यवसायिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नोकरीची 100 टक्के हमी, पात्रता 8वी उत्तीर्ण असलेले बेरोजगार, 18 ते 35 वयोगटातील बेरोजगार युवक युवती करिता पुढील व्यवसायिक प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. संस्थेमार्फत युवकांसाठी गणवेश, जेवण, वस्तीगृहाची मोफत सोय उपलब्ध आहे. तसेच युवतीं करीता गणवेश मोफत दिला जाणार आहे. उपलब्ध कोर्स – हॉटेल मॅनेजमेंट फूड अँड बेव्हरेज सर्व्हिस, हाऊस किपिंग, (महिला वर्ग/ पुरुष) ब्युटीपार्लर (फक्त महिला वर्ग)

प्रशिक्षण कालावधी -
 45 दिवस असणार आहे . इच्छुक उमेदवारांनी आपले प्रवेश अर्ज सोमवार 15 जानेवारी 2024 ते 20 जानेवारी 2024 या कालावधीत संपर्क करून निश्चित करावेत. सर्वप्रथम 100 येणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
Exit mobile version