| कामोठे | वार्ताहार |
योग हा भारतीय संस्कृतीचा भाग आहे, जो एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आणि सामाजिक अस्तित्वाला चालना देण्यासोबत शरीर आणि मन संतुलित आणि शांत करण्यासाठी केला जातो. योगाने शरीरातील लवचिकता, स्नायूंची ताकद आणि बॉडी टोन वाढवण्यातही मदत होते. योगाची विविध आसने श्वसन, ऊर्जा आणि जीवनशैली सुधारतात. योगामुळे शरीर आणि मनाला शांती देऊन शारीरिक आणि मानसिक शिस्त मिळते. तसेच तणाव आणि चिंता व्यवस्थापित करण्यात मदत करते आणि त्यामुळे मनुष्य तणावमुक्त राहण्यास मदत होते.
सध्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्य निरोगी राहावे यासाठी नवीन वर्षात जीवन विद्या मिशन आणि श्री अंबिका योगाश्रम तर्फे विनामूल्य योग प्रशिक्षण वर्ग जीवन विद्या मिशन, सेक्टर 6, कामोठे येथे रविवार 7 जानेवारी पासून सकाळी 7. 30 ते 9. 30 या वेळेत होणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभाग नोंदवावा यासाठी जीवन विद्या मिशन आणि श्री अंबिका योगाश्रम तर्फे कामोठेकरांना आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9324187651 / 9833851324 या नंबर वर संपर्क करावा अशी माहिती संतोष गाढे यांनी दिली.





