ट्रॅक्टरच्या धुरापासुन शेतकऱ्यांची मुक्तता

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| मुंबई | प्रतिनिधी |

शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याला किंवा शेतशजुरांना आता प्रदुषणमुक्त वातावारणात काम करता येणार आहे. ट्रॅक्टरच्या धुरापासुन शेतकऱ्यांची मुक्तता होणार आहे. त्याबाबत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. पुण्यात आयोजित आंतरराष्ट्रीय टनेल वर्कशॉप परिषदेत ते बोलत होते. यावेळी गडकरी म्हणाले की, आता सगळीकडे हायड्रोजन, इथेनॉल या इंधनाचा वापर आपल्याला करावा लागेल. यात मी खूप काम करत आहे, आपल्याला मिळून यात काहीतरी करायला हवे. आता ट्रॅक्टर देखील आपण इलेक्ट्रिक, इथेनॉल, सीएनजीवर चालणारे बनवत आहोत. माझ्या शेतात मी सीएनजीवर चालणारा ट्रॅक्टर वापरत आहे. प्रदुषणमुक्त आणि खर्चाची बचत करणाऱ्या अशा गोष्टींचा आता आपल्याला शेतीमध्ये वापर करावा लागणार आहे, असेही गडकरींनी यावेळी सांगितले.

Exit mobile version