उद्यापासून लॉकडाऊनपासून स्वातंत्र्य

रात्री 10 वाजेपर्यंत सर्व दुकानांना परवानगी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
भारतीय स्वातंत्र्य दिन अर्थात 15 ऑगस्टपासून लॉकडाऊनपासून देखील स्वातंत्र्य मिळणार आहे. रायगड जिल्ह्यासह राज्यातील सर्व दुकानांबाबतचे निर्बंध आणखी शिथिल करण्यात आले असून. आता सर्व दुकाने सर्व वारी रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहतील. आतापर्यंत दुकानांना सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा होती. नवे नियमांची 15 ऑगस्टपासून अंमलबजावणी केली जाणार आहे.
अत्यावश्यक तसेच अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने आठ वाजेपर्यंतच सुरू होती. आज या दुकानदारांनाही दिलासा देत मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी नवे नियमावली जाहीर केली. सर्व दुकाने तसेच शॉपिंग मॉल रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु, शॉपिंग मॉलमध्ये कोविड लसीचे दोन्ही डोज घेणार्‍यांनाच प्रवेश देण्यात यावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहे.
इनडोअर खेळांसाठी खेळाडूंचेही दोन्ही डोज पूर्ण झालेले आवश्यक आहे. ब्युटी पार्लर, जिम, सलून, स्पाही रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहील. परंतु, क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांनाच परवानगी असेल. रेस्टॉरंट, उद्यानाबाबत जुनेच आदेश लागू आहे. त्यामुळे रेस्टॉरंट, बार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहतील. उद्यान दिवसभर सुरू राहील. शेती, बांधकामे नियमित सुरू राहील.

अशी आहे नियमावली
सर्व दुकाने, शॉपिंग मॉल रात्री 10 पर्यंत
रेस्टॉरंट, बार, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, जिम रात्री 10 पर्यंत (क्षमतेच्या 50 टक्के)
विवाह सोहळ्यात खुले प्रांगण असेल तर दोनशे जणांना परवानगी, हॉलमध्ये 100 लोकांना परवानगी
इनडोअर क्रीडा प्रकारासाठी खेळाडूंनी दोन्ही डोज आवश्यक
सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम रात्री 10 वाजेपर्यंत (क्षमतेच्या 50 टक्के)
शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे, जलतरण, नाट्यगृह, सिनेमागृह बंद
रविवारीही दुकाने राहणार सुरू

Exit mobile version