मालवाहू ट्रकचा अपघात

| खेड | प्रतिनिधी |
महामार्गावरील अवघड कशेडी घाट उतरताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक डाव्या बाजूला दरडीवर आदळून अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक आणि क्लिनर दोघेही ट्रकच्या केबिनमध्ये अडकून पडले.

अपघाताची खबर मिळताच कशेडी टॅप येथील वाहतूक पोलीस तसेच नरेंद्र महाराज संस्थांची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. दरम्यान, घटनास्थळी क्रेनला पाचारण करण्यात आले. क्रेन आल्यावर चेपलेली केबिन ओढून सरळ केल्यावर दोघांनाही बाहेर काढण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या या दोघांनाही कळबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. खेड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version