| आगरदांडा | प्रतिनिधी |
सध्याचे युग माहिती तंत्रज्ञानाचे आहे. ॲप ही खूपच सामान्य बाब बनली आहे. मोबाईलवरील ॲपच्या आधारे घरबसल्या हवे ते मागवू शकतो. सुरक्षेपासून ते आरोग्यापर्यंत ॲपचा आधार घेतला जात आहे. शहरासह ग्रामीण भागात युवकांकडून याचा जास्त वापर होत आहे.
जगभरात लाखो ॲप तयार करण्यात आले आहेत. परंतु, आता आपल्या शहरापुरतेही ॲप विकसित होऊ लागले आहेत. विविध सेवांसाठी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसत आहे. सुरक्षेपासून ते आरोग्यापर्यंत प्रत्येक क्षेत्रात ॲपचा वापर होत आहे. रेल्वे, बस, विमान तिकीट, हॉटेल, आरक्षण ॲपच्या माध्यमातून मोबाईल, डिश रिचार्ज करणे, इतरांच्या खात्यावर पैसे पाठविणे बँकिंग ॲप, वस्तू खरेदी करणे, शैक्षणिक, भाषांतर, न्यूज ॲप, खरेदी आणि विक्री ॲप आदींचा सर्रास वापर केला जातो. फॅमिली डॉक्टर, मोठ मोठ्या हॉस्पिटल्स या सर्वांचे ॲप आता नागरिकांच्या मोबाईलमध्ये आहेत. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये किमान 15 तरी ॲप डाऊनलोड केलेले दिसतात. ॲपचा व्यवसाय सध्या प्रचंड तेजीत चालला असला तरी पालकांच्या खिशाला कात्री पडली आहे.
सुरक्षेपासून आरोग्यापर्यंत मोबाईल ॲपचा आधार
