‘वळण’ ची सिल्व्हर ज्युबिली शॉर्ट फिल्मपर्यंत मजल

कर्जतचे नाव उंचावले
। नेरळ । वार्ताहर ।

कर्जत येथील होतकरू कलावंत लेखक,दिग्दर्शक या भूमिकेत वावरणारे प्रदीप गोगटे यांनी वर्षभरापूर्वी निर्माण केलेल्या वळण या शॉर्ट फिल्मने सिल्व्हर ज्युबिली पर्यंत मजल मारली आहे. आंतराष्ट्रीय स्तरावर या शॉर्ट फिल्मने झेप घेतली असून कर्जत तालुक्यासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे.
वळणचे शूटिंग करून एक वर्ष पूर्ण करताना 25 अवॉर्ड आणि 27 शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये संन्मानित करण्यात आले आहे. या शॉर्ट फिल्मला अनेक ठिकाणी अवॉर्ड मिळाल्याने कर्जतचे नाव उंचावले आहे. 29जानेवारीला वळण या शॉर्ट फिल्मचे रेकॉर्डिंग झाले होते आणि या शॉर्ट फिल्मने तब्बल नऊ आंतरराष्ट्रीय स्तरावरील अवॉर्डस मिळविले आहेत.उत्कर्ष इव्हेंट्सच्या या वळणने कर्जतचे नाव उंचावले असून या शॉर्ट फिल्मची निवड होण्याचा क्षण आयुष्यातला अविस्मरणीय क्षण आहे असे या शॉर्टफिल्मचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते प्रदिप गोगटे मानतात. तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात 25 अवॉर्ड मिळवून शॉर्टफिल्म वळणने इतिहास रचला आहे. नवोदित कलाकार आणि बालकलाकार यांना खर्‍या अर्थाने व्यासपीठ देणारे गोगटे यांनी शॉर्टफिल्म वळणच्या माध्यमातून तालुक्याच नाव आतंरराष्टीय स्तरावर नेल आहे. सर्व स्तरातून यांचे आणि यांच्या टीमचे कौतुक होत आहे. 2022 या वर्षात उत्कर्ष इव्हेंट्सच्या माध्यमातून व्यावसायिक नाटक, एकांकिका, शॉर्टफिल्म करण्याचा मानस गोगटे यांनी केला आहे.आणि मुख्य म्हणजे वळण या पहिल्या शॉर्ट फिल्ममध्ये सर्व कलाकार हे स्थानिक आहे. वळण ही फिल्म प्रसिद्ध झाल्याने अनेक ठिकाणी पुरस्कार मिळत आहे .
या शॉर्टफिल्म मध्ये ऋत्वि ओसवाल,आरवी ओसवाल,राज साळवी,स्पंदन पडते,साईराज खंडागळे,राजवी डोंबे, स्फूर्ती पडते या बालकलाकारांच्या सोबत पूजा बंदरकर, विशाल रोकडे,आरती,दिगंबर म्हसकर,शर्वरी जाधव आणि हेमंत वाघुले यांनी भूमिका साकारल्या आहेत. या शॉर्टफिल्मला डीओपी हृषीकेश दांडेकर तर एडिटिंग प्रथमेश जाधव यांनी केले आहे. स्टोरी आणि दिग्दर्शन प्रदिप गोगटे यांचे आहे. तसेच प्राँडक्शन्स टीम म्हणून दिलिप गोगटे, मितेश कोळी, मोहित जाधव, शुभम कलघटगी, नचिकेत लाड, बाबू सकपाळ, तुकाराम जाधव यांनी उत्कृष्टपणे सांभाळले आहे. तसेच मेकअप अभय शिंदे, फोटो डिझाइन्स माधुरी गोगटे, संगीत स्टुडिओ साऊंड गॅरेजचे संजय पाठक यांनी केले आहे. तर शॉर्टफिल्म ‘वळण’चे शूटिंग कर्जत, आवळस, नेवाळी आणि खारघर येथे झालेली असून दोन दिवस आणि 29 तासांचे हे शूटिंग होते.

शॉर्ट फिल्म..
या शॉर्ट फिल्मची सुरुवात होते ती काही लहान मुले शाळेच्या पायर्‍या चढतात आणि शाळेचे वर्ग सुरु होते.वर्गात मराठीच्या शिक्षक एक कविता शिकवत असताना दोन मुले वर्गात मोबाईल वर गेम खेळात असतांना त्या शिक्षकीचे लक्षात येते. त्या वेळी चाणाक्ष शिक्षिका यांच्याकडून त्या विद्यार्थ्यांला कालच्या होमवर्क ची आठवण करून दिली जाते आणि विद्यार्थी माझे गाव या विषयावर सांगू लागतो.पण मध्येच थांबतो आणि बाईंना म्हणतो आम्ही गावच बघितले नाही. हीच त्या शहरी भागातील शाळा असलेल्या वर्गातील सर्व मुलांची व्यथा माडली आहे.

मतीतार्थ..
शहरात वाढत चालेल्या सिमेंटचे जंगल आणि धकाधकीचे जीवन मुलांचे हरवलेले लहानपण तसेच याच शहरातील लहान मुलांना गाव आणि गावाकडील संस्कृती याबद्दल कमी होत चाललेली माहिती यावर वळण शॉर्टफिल्म ची कथा अवलंबून आहे. शहरातील लहान मुलांच्या दृष्टीकोनातून गावाकडच्या संस्कृती बद्दल विचार करतानाची गोष्ट म्हणजे वळण.

Exit mobile version