। मुंबई । वृत्तसंस्था ।
2021 हे वर्ष संपून, नववर्षाच्या आगमनाला मोजून 15 दिवस बाकी आहेत. पण या दिवसात दि.16 ते 31 डिसेंबर पर्यंत बँका फक्त पाच दिवसच कामकाज पाहणार आहेत. तेव्हा आपली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा इशारा ग्राहकांना देण्यात आला आहे.
डिसेंबर समाप्तीच्या पंधरवड्यात 10 दिवस बँका बंद राहणार आहेत. खरेतर हे बँक हॉलिडे वेगवेगळ्या राज्यांच्या हिशोबाने आहेत. देशातील सरकारी बँक कर्मचारी 16 आणि 17 डिसेंबरला संप पुकारणार आहेत. ज्यामुळे या दोन्ही दिवस बँकांमध्ये कामकाज होणार नाही. यूनायडेट फोरम ऑफ बँक यूनियनकडून याविषयी माहिती देण्यात आली आहे.
सरकारच्या खासगीकरणाविषयी सुरू असलेल्या तयारींचा विरोध करण्यासाठी युएफबीयूने संप करण्याची घोषणा केली आहे. युएफबीयअंतर्गत बँकांची 9 यूनियन येते. तर अन्य दिवशी विविध सुट्ट्यामुळे बँकाचे कामकाज बंद असणार आहे.
कोणकोणत्या दिवशी असणार सुट्टी
16 डिसेंबर – बँकेचा संप
17 डिसेंबर – बँकेचा संप
18 डिसेंबर – यू सो सो थाम यांची डेथ अॅनिवर्सरी (शिलॉन्गमध्ये बँका बंद)
19 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
24 दिसंबर – ख्रिसमस
25 डिसेंबर – ख्रिसमस आणि चौथा शनिवार
26 डिसेंबर – रविवार
27 डिसेंबर – ख्रिसमस सेलिब्रेशन
30 डिसेंबर – यू कियांग नॉन्गबाह (शिलॉन्गमध्ये बँका बंद)
31 डिसेंबर – न्यू ईयर्स ईव्हिनिंग