तिवरे धरण दुर्घटनेमुळे पुलांसाठी निधी

। चिपळूण । वार्ताहर ।
दोन वर्षांपूर्वी तिवरे दुर्घटनेने चिपळूण पूर्व विभागातील दसपटी परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. या सार्‍या पार्श्‍वभूमीवर आ. शेखर यांनी दूरदृष्टी ठेवून दसपटी परिसरातील पुलांसाठी भरघोस निधी मंजूर करून आणला होता. या परिसरात अशा घटना नजरेसमोर ठेवून आमदार निकम यांनी आधीच नियोजन करून ठेवले होते. कळकवणे तिवरे आकले रस्त्यावरील 1.40 किमी मोठ्या पुलाच्या पुनरदुरुस्ती साठी 3 कोटी 60 लाख,0.780 किमी मोठ्या पुलाच्या पुनरदुरुस्ती साठी 3 कोटी, आणि 2.730 किमी छोट्या पुलाच्या पुनरदुरुस्तीसाठी 90 लाख मंजूर करून आणले आहेत. सोबत पिंपळी नांदीवसे रस्त्यावरील लहान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी देखील निधी मंजूर करून आणला होता.

सदरचा निधी पावसाळ्यानंतर उपयोगात आणून सदर पुलांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वीच कळकवणे तिवरे आकले रस्त्यावरील 0.780 किमी लांबीचा पुल व पिंपळी नांदीवसे रस्त्यावरील लहान पुल अतिवृष्टीने वाहुन गेला आहे. तरीदेखील आमदार शेखर निकमांनी दूरदृष्टीने आधीच या पुलांसाठी निधी मंजूर करून आणल्याने पावसाळ्यानंतर या पुलांची पुनर्बांधणी व पुनरदुरुस्ती करण्यात येणार असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही. यामुळे दसपटी परिसरातील नागतमरिकांनी आ. निकम यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Exit mobile version