। सिंधुदुर्ग । प्रतिनिधी ।
पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत वातावरणातील बदलाला तोंड देण्यासाठी किनारपट्टी मच्छिमार गावे विकसित करण्यासाठी भारत सरकारने 2 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टीवरील वीस गावांचा समावेश असल्याची माहिती रविकिरण तोरसकर यांनी दिली आहे. या योजने मध्ये पालघर- चार, ठाणे- एक, मुंबई उपनगर- दोन, मुंबई शहर- एक, रायगड- चार, रत्नागिरी- चार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील- चार गावांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक गावाला दोन कोटी रुपये एवढा निधी दिला जाणार आहे. यामधील मच्छीमारांसाठी पायाभूत सुविधांसाठी 70% (रुपये एक कोटी चाळीस लाख) ज्यामधे छोट्या मच्छीमार जेट्टी यांची दुरुस्ती, बायो टॉयलेट व इतर पायाभूत समावेश आहे. तर 30% रक्कम (रू.60 लाख) ही मत्स्य व्यवसायातील अर्थ विषय कार्यक्रम यावर खर्च होणार आहे.