पवन तलाव, गोवळकोट क्रीडांगणासाठी निधी मंजूर

आ. शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश
3 कोटी 35 लाखांचा मिळणार निधी
| चिपळूण | प्रतिनिधी |
चिपळूणमधील ऐतिहासिक पवन तलाव मैदान सुशोभीकरणासाठी राज्य शासनाकडून 2 कोटी 25 लाख रुपयांचा निधी तर गोवळकोट येथील क्रीडांगण विकसित करण्यासाठी 1 कोटी 10 लाख रुपयांचा असा 3 कोटी 35 लाखांचा निधी मंजूर करून आणण्यात आमदार शेखर निकम यांना यश आले आहे.

राज्य शासनाकडून चिपळूण नगर परिषदेच्या या दोन क्रीडांगणांच्या विकासासाठी तीन कोटी 35 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिल्याचे पत्र बुधवारी (दि. 28 जुलै) राज्याचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी दिले आहे. काही दिवसांपूर्वी पवन तलाव विकसित व्हावे व गोवळकोट येथील क्रीडांगण सुसज्ज व्हावे, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून, राज्यातील नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान दिले जाते. त्यातून तीन कोटी 35 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.

Exit mobile version