सहजसेवेच्या पुढाकारातून कोरोना रुग्णावर अंत्यसंस्कार

। रसायनी । वार्ताहर ।
कोरोनाच्या संकटात अनेक जण मृत्युमुखी पडत आहेत. महाराष्ट्रात बर्‍याच संस्था व व्यक्ती अंत्यसंस्कार करण्यासाठी आपापले योगदान देत असतात. समाजात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणार्‍या व्यक्ती व संस्थामुळे गरजू घटकांना याचा मोठा आधार होत आहे.

दि. 28 जून रोजी खालापूर येथील ज्येष्ठ नागरिक कोरोनामुळे मयत झाले असता खालापूर तालुक्यातील ज्येष्ठ शिवसेना नेते व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे नवीन घाटवळ यांनी केलेल्या मदतीच्या आवाहनाला साद देऊन सहजसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, उपाध्यक्षा इशिका शेलार, कार्यवाह बी. निरंजन, बंटी कांबळे, आफताब सय्यद यांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करून सदर प्रेताचे खालापूर येथील स्थानिकांच्या मदतीने अंत्यसंस्कार पूर्ण केले. या अंत्यविधीसाठी पीपीई किट कर्जत येथील युसूफ भाई यांनी उपलब्ध करून दिले.

24 तास निःशुल्क सेवा
कर्जत व खालापूर तालुक्यात आवश्यक असल्यास 24 तास निःशुल्क सेवा पुरविण्यास सहज टीम 24 तास उपलब्ध आहे. गरजूंना यासाठी नक्की कळवावे, असे आवाहन सहज सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे यांनी केले आहे.

Exit mobile version