बबलू 11 भाताण संघाने मारली बाजी
| खोपोली | प्रतिनिधी |
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नावाने मानकीवली येथील मैदानात भावी आमदार क्रिकेट स्पर्धेचे आयोजन (दि.7 )ते (दि.10) मार्च यादरम्यान करण्यात आले होते. या स्पर्धेत खालापूर व कर्जतमधील 32 संघांनी सहभाग घेतला होता. या भावी आमदार चषकावर बबलू 11 भाताण संघाने नाव आपले वर्चस्व दाखवून दिले. तर द्वितीय क्रमांक नावंढे संघाने, तृतीय क्रमांक चिंचवली संघाने तर चतुर्थ क्रमांक आत्करगाव संघाने मिळवल्याने या सर्व विजयी संघांना रोख रक्कम व आकर्षक ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. मालिकावीर खेळाडू भाताण संघाच्या जयेश भोईरला आकर्षक ट्रॉफी आणि कुलर देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेचे आयोजन जय भैरवनाथ क्रिकेट संघ केलवली व शिवसेना-युवासेना शाखा केलवली यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या दरम्यान नितीन सावंत, एकनाथ पिंगळे, उत्तम कोळंबे, हुसेन खान, प्रशांत खांडेकर, भरत देशमुख, प्रफुल्ल विचारे, तुळशीराम पाटील, संभाजी पाटील, अविनाश पालाडे, मनीष पालांडे, प्रणाल लाले, मयूर ठोंबरे, स्वप्नील सुर्वे, कल्पेश पाटील, गणेश मोरे, सागर पिंगळे, तानाजी दिसले, कमलाकर बोराडे, संतोष देशमुख, योगेश पालांडे, शरद हडप, उत्तम पालांडे, अखिल दुस्ते आदी उपस्थित होते.