गो.म. वेदक विद्यामंदिरचा निकाल 96.70 टक्के

। तळा । वार्ताहर ।
तळा विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गो.म. वेदक विद्यामंदिर तळाचा एकूण निकाल 96.70 टक्के, तर प्रभाकर म. जोशी प्रशाला पन्हेळीचा 90.91 टक्के निकाल लागला आहे. गो.म. वेदक विद्यामंदिर शाळेत प्रथम क्रमांक ज्ञानेश्‍वर यशवंत कांबळेकर 88.60%, द्वितीय क्रमांक गौरव राजाराम थोरात 86.60% व तृतीय क्रमांक तेजस गणेश शिंदे 83 % घेऊन उत्तीर्ण झाले. या केंद्रातून एकूण 91 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी तीन विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले तर 88 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर पन्हेळी हायस्कूलचा निकाल 90.91% लागला असून, यामध्ये प्रथम क्रमांक विनया विजय महागावकर 85.80% द्वितीय क्रमांक मयुरी गोपाळ देवकर 81.40% तर तृतीय क्रमांक पूजा शरणप्पा बंडगेर 76.20% क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.या केंद्रातून एकूूण 11 विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी 1 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला असून 10 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याला कलाटणी देणारा हा दहावीचा निकाल असल्याने याकडे विद्यार्थी व सर्व पालकांचे लक्ष लागले होते. ग्रामीण दुर्गम डोंगराळ भाग असलेल्या तळा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी शिक्षणात नेहमीच चांगल्या प्रकारे प्रगती केलेली दिसत आहे तालुक्यात तळे शिक्षण प्रसारक मंडळाचे गो.म.वेदक.विद्यामंदिर तळा व डॉ. प्रभाकर जोशी प्रशाला पन्हेळी या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 10 वी च्या परिक्षेत मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी प्राचार्य शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version