आपटा येथे स्मशानभूमीतच जुगाराचा अड्डा

रसायनी पोलिसांकडून दहा जणांवर गुन्हा

| आपटा | वार्ताहर |

आपटा गावातील एका स्मशानभूमीजवळ मोकळ्या शेडमध्ये सुरु असणार्‍या जुगार अड्ड्यावर रसायनी पोलिसांनी मंगळवारी (दि.10) धाड टाकत दहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, अद्याप एकाला अटक करण्यात आलेली नाही.

दरम्यान, याठिकाणी रोख रक्कम, रिक्षा व एक मोटारसायकल इत्यादी सर्व मिळून 1 लाख 67 हजार 960 रुपयांच्या मालमत्ता घटनास्थळावरुन पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या कारवाईदरम्यान शब्बीर मोहम्मद सईद मुलला, हरिश जोमा सावंत, कुरेश शहाबुद्दीन सिध्दीकी, रमेश सावंत, विजय बाटे, शंकर राठोड, प्रदीप कांबळे, सचिन सनगरे, दत्ता वाघे, जनार्दन सावंत जुगार खेळताना सापडले. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी अश्‍वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार खाडे करीत आहेत.

Exit mobile version