गणरायाला द्राक्षांची आरास

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

पालीतील बल्लाळेश्वराच्या माघोत्सवाच्या पूर्वसंध्येला नाशिक येथील उद्योजक नितीन गिरासे या भाविकाकडून 500 किलो द्राक्षापासून तोरण बनवून मंदिर सजावट करण्यात आली. ही सजावट आकर्षक करण्यासाठी फुले, पाने यांचादेखील वापर करण्यात आला. द्राक्षाच्या तोरणांनी मंदिराच्या आतील सभागृह, कमान, गाभाऱ्याची सुंदर अशी सजावट करण्यात आली. या सजावटीसाठी गुरुवारी रात्री सुरुवात केली. शुक्रवारी सकाळपर्यंत ती पूर्ण केली.

ही देखणी सजावट हिमानी जेटवा, पंकज राजपूत आणि त्यांच्या 15 सहकाऱ्यांच्या मदतीने पूर्ण केली. द्राक्षापासून मंदिराची केलेली सजावट बघण्यासाठी भाविकांनी, पालीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बल्लाळेश्वर चरणी गर्दी केली होती.

Exit mobile version