गांधी चौक बनला वाहनांचा अवैध पार्किंग

| उरण | वार्ताहर |
उरण नगरपालिका हद्दीतील उरण शहरात गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ अवैधरित्या वाहने राजरोसपणे पार्किंग करून ठेवली जात असून, या वाहनांमुळे गांधीजींचा पुतळा दिसेनासा होत आहे. या पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

उरण शहर हे सुंदर असे शहर आहे. संपूर्ण शहर मोटारसायकलवरून दहा मिनिटांनी फिरून होईल एवढेच शहर आहे. मात्र, शहरातील रस्त्यांवर पार्किंगची नियोजनाची व्यवस्था नगरपालिकेकडून करण्यात न आल्याने वाहन चालक कोठेही जागा मिळेल तिथे आपली वाहने पार्क करून ठेवण्यात धन्यता मानतात, त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. या वाहतूक कोंडी समस्येवर उपाययोजना करण्याकडे उरण नगरपरिषद कानाडोळा करत आहेत. त्यात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार्‍या महापुरुषांच्या पुतळ्याजवळ आपली वाहने पार्क करून ठेवण्यात विशेष म्हणजे बंद पडलेल्या गाड्याही ठेवण्यात आल्या आहे. मात्र, याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

या संदर्भात आम्ही सूचना दिल्या आहेत. मात्र, आता वाहतूक विभागला पत्र देऊन गांधीजींच्या पुतळ्याजवळ लावणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यास सांगण्यात येईल. वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी ठराव ही तयार करण्यात आला आहे. येत्या काही दिवसात रस्त्याच्या दोन्ही साईटला पट्टे मारून सम-विषम विषम असे बोर्ड मारण्यात येतील आणि त्यानंतर वाहनांवर कारवाई केली जाईल.

– संतोष माळी, मुख्याधिकारी, उरण नगरपरिषद
Exit mobile version