गांधीजींचे तत्त्वज्ञान जगाला मार्गदर्शक ; अन्वर मोडक

। चिपळूण । वार्ताहर ।
सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना उद्बोधित करताना, सत्य, अहिंसा व सत्याग्रह या त्रिसूत्रीच्या माध्यमातून भारत देशाला स्वातंत्र प्राप्त करून देण्यासाठी जनतेच्या मनात उज्वल देशभक्ती निर्माण करून या तत्त्वांच्या आधारे ध्येय प्राप्त करताना रक्ताचा एक थेंबही न सांडता लोकशाही मार्गाने यशप्राप्ती कशी करता येते, याचा आदर्श गांधीजीनी जगासमोर ठेवला आहे. तर जय जवान जय किसान हा नारा देऊन स्वकर्तुत्वाने जगाला प्रभावित करण्याचे काम लालबहादूर शास्त्री यांनी केले, असे मत विद्यालयाचे मुख्याध्यापक अन्वर मोडक यांनी व्यक्त केले आहे.


या कार्यक्रमात विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक जयंत काकडे व स्फूर्ती जाधव यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याची ओळख करून देणारे सचित्र भित्तिपत्रक तयार करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक जयंत काकडे यांनी केले.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक अन्वर मोडक, पर्यवेक्षक उद्धव तोडकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ऑफलाइन तर विद्यार्थी ऑनलाइन पध्दतीने उपस्थित होते.

Exit mobile version