म्हसळ्यात गणेशोत्सव उत्साहात

| म्हसळा | वार्ताहर |

दैवज्ञ समाज गणेश मंदिर ट्रस्ट म्हसळा यांच्या विद्यमाने म्हसळा येथील श्री गणेश मंदिरात सालाबाद प्रमाणे याही वर्षी माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटे श्रींचा अभिषेक, पूजाविधी, दैवज्ञ समाज महिला मंडळ यांचे संगीत भजन, सिद्धीकला भजन मंडळाचे संगीत भजन, असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास दैवज्ञ समाज अध्यक्ष सुनील उमरोठकर, अनिल पोतदार, गौरव पोतदार, सौरव पोतदार, अशोक पोतदार, महेंद्र पोतदार, गौरी प्रसाद पोतदार, संपदा पोतदार, दादा पानसरे, महादेव कदम, रेखा धारिया आदि मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version