गणेश मुळे यांची जिल्हा माध्यम कक्षास भेट

| रायगड | खास प्रतिनिधी |

माहिती व जनसंपर्क महासंचालयाचे कोकण विभागीय उपसंचालक गणेश मुळे यांनी जिल्हा माध्यम कक्षास भेट देऊन पाहणी केली. त्यांनी माध्यम कक्षातील इलेक्ट्रॉनिक मीडिया सेलसह विविध दैनंदिन कामकाजाची माहिती घेतली. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना व निर्देशानुसार निवडणूक विषयक कामकाज करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रांगणात मतदान जनजागृतीसाठी उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटला भेट देऊन सेल्फी घेतली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे, माहिती अधिकारी किरण वाघ, माध्यम कक्षासाठी नियुक्त अधिकारी तसेच कार्यालयातील विविध शाखांचे कर्मचारी आदी उपस्थित होते. जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली असून माध्यम कक्षातून उमेदवारांच्या प्रचार जाहिराती याचे प्रमाणीकरण करण्याची कार्यवाही केली जाते. जिल्हा निवडणूक प्रशासनाच्यावतीने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक संबंधी प्रसार माध्यम व वृत्तपत्र प्रतिनिधी यांच्याशी समन्वय राखला जात असल्याची माहिती त्यांना देण्यात आली.

Exit mobile version