गणेश नाईकांचा जामीन फेटाळला

। मुंबई । वृत्तसंस्था ।
भाजपचे नेते आणि आमदार गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने नाकारला असून, त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. गणेश नाईक यांच्या अंतरिम जामिनावर येत्या 27 तारखेला सुनावणी होणार आहे. गणेश नाईक यांच्या विरोधात रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावणे आणि बलात्काराचा आरोप या दोन केसेस ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहेत. त्यामध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावणे यावर गुरुवारी सुनावणी झाली. यासंबंधी पोलिसांना काय वाटतं हे महत्त्वाचं असून, ते समोर आल्याशिवाय जामीन देता येणार नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे. यामुळे गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ झाली असून, त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे. 

Exit mobile version