उद्यापासून मांडवा-मुंबई जलवाहतुकीस प्रारंभ
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मांडवा-मुंबई जलवाहतूक 1 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. यामध्ये पी.एन.पी आणि मालदार कंपनीची बोट सुरु करण्यात येणार आहे. जलवाहतूक सुरु होणार असल्याने अलिबाग, मुरुडकर यांच्यासह रायगडकरांचा मुंबई प्रवास सुखकर होणार आहे.
पी.एन.पी, मालदार, अजंठा, अपोले या कंपन्यांच्या बोटी मांडवा ते गेट वे जलवाहतूक मार्गावर प्रवासी सेवा देतात. पावसाळ्याचे चार महिने ही सेवा बंद होती. अलिबागकरांना स्वस्त दरात आणि कमी वेळेत मुंबई गाठणे या जलवाहतुकीमुळे शक्य होते. तसेच असंख्य पर्यटकही या जलवाहतुकीचा आनंद घेण्यासाठी येत असतात.
३१ ऑगस्ट पासून गणेशोत्सव सुरु होत आहे. दरम्यान, 1 सप्टेंबरपासून जलवाहतूक सेवा सुरू होणार असल्याचे मुंबईतून येणार्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होणार आहे.