नवजात बाळांच्या खरेदी-विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

| पुणे | वृत्तसंस्था |

पुण्यातील एका सुप्रसिद्ध रुग्णालयामधील एका नर्सच्या मदतीने पुणे शहरातील काही महिला नवजात बाळांची खरेदी विक्री व्यवहार करत असल्याचं पोलिस तपासात उघडकीस आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या दांपत्याला वंध्यत्वाची समस्या आहे. अशा दांपत्याची माहिती रुग्णालयामध्ये काम करणारी नर्स या टोळतील महिलांना देत होती. त्यानंतर टोळीतील महिला वंध्यत्व समस्या भेडसावत असलेल्या दांपत्यांना मिळून त्यांना पाच ते सात लाखात नवजात बाळ विकत देण्याचा प्रलोभन देत असायच्या. त्यासाठी या टोळीतील महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले दांपत्य शोधायचे. ज्या दांपत्याकडे दोन पेक्षा जास्त मुले आहेत आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. अशा दांपत्याला पैशाचं आमिष दाखवून या टोळीतील महिला गरजवंत दांपत्याला नवजात बाळ विकत होते. या टोळतील महिलांनी पुणे शहराबाहेर आणखी कुठे बाळांची खरेदी – विक्रीचे व्यवहार केले आहेत का ? याचा शोध सध्या वाकड पोलिस घेत आहेत. या प्रकरणात सध्या वाकड पोलिसांनी सहा महिलांना ताब्यात घेतलं असून त्यांच्या विरोधात वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. ज्या दांपत्यांनी या टोळीतील महिलांकडून नवजात बालकांची बेकायदेशीर खरेदी केली अशा दांपत्यावरही पोलीस कठोर कारवाई करणार आहेत.

Exit mobile version