सोनसाखळी चोरांची टोळी जेरबंद

। ठाणे । प्रतिनिधी ।

ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात सोनसाखळी, मोबाईल, दुचाकी आणि चारचाकी चोरट्यांना कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्याकडून 50 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या चौकडीने थोडे थोडके नाही तर तब्बल 70 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. तौफिक हुसेन (29), कालिचरण झवेरी अली (36), अब्बास जाफरी (27) आणि सुरज उर्फ छोट्या साळुंखे सर्व रा. आंबिवली अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या गुन्ह्यांची माहिती दिली.

ठाणे जिल्ह्यातील भिंवडी, ठाणे, बदलापुर, अंबरनाथ तसेच कल्याण, शिळ डायघर परिसरातील महिला व पुरूषांच्या गळयातील जबरीने सोन्याचे मंगळसुत्र, चैन खेचुन चोरी करणार्‍या सराईत चोरट्यांना कल्याण क्राईम ब्रांचने अटक केली आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत असतांना या गुन्ह्यातील व ठाणे शहरात विविध ठिकाणी केलेल्या जबरी चोरीतील संशयित इसम हे कल्याणजवळील आंबिवली परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी आंबिवली परिसरातील इराणी वस्तीमध्ये सापळा लावुन सशंयित इसम तौफीक हुसेन, मोहम्मद अली उर्फ कालीचरण झवेरी अली, अब्बास जाफरी आणि सुरज उर्फ छोटया मनोज सांळूखे यांना मोठ्या शिताफिने ताब्यात घेण्यात आले.

Exit mobile version