42 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

चार संशयितांना बेड्या
। नाशिक । वृत्तसंस्था ।

सामूहिक बलात्काराने नाशिक जिल्हा हादरला असून, वणी येथे एका महिलेवर अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित महिला आणि तिचा मित्र बसस्थानक परिसरात बसले होते. तेव्हा या परिसरात असलेल्या संशयितांनी त्यांना येऊन धमकी दिली आणि पीडितेवर बुधवारी रात्री अकरा वाजता सामूहिक अत्याचार केला. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात चार संशयितांविरोधात सामूहिक बलात्कारासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली आणि या प्रकरणातील चारही संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. नाशिकसारख्या जिल्ह्यात सामूहिक बलात्काराच्या घटना घडत असतील तर आरोपींना पोलिसांचा जराही धाक राहिलेला नाही का, असा सवाल यानिमित्ताने विचारला जात आहे. तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Exit mobile version