संतापजनक! अल्पवयीन मुलावर नऊ जणांचा सामूहिक अत्याचार

। अहमदनगर । प्रतिनिधी ।

अहमदनगर जिल्ह्यातून एक अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. नऊ जणांनी मिळून 11 वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला आहे. विशेष म्हणजे अत्याचार करणारेदेखील अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात हि घटना घडली आहे. 11 वर्षीय अल्पवयीन मुलाला धमकावून त्याच्यावर नऊ जणांनी मिळून अनैसर्गिक अत्याचार केला. तसेच, अत्याचार करणारेदेखील अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत पीडित मुलाच्या आईने श्रीरामपूर पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

Exit mobile version