रक्तचंदन विकणार्‍या टोळीचा पर्दाफाश! तीन आरोपी ताब्यात

| माणगाव | प्रतिनिधी |

रक्तचंदन विकणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यात माणगाव पोलिसाना यश आले आहे. थरारक पाठलाग करीत पोलिसांनी तिघांना अटक करुन त्यांच्याकडून 40 किलो रक्तचंदन जप्त केले आहे.

रायगडमध्ये रक्त चंदन विकण्यासाठी चोरटे येणार असल्याची खबर पोलिसांना लागली होती.त्यासाठी पोलिसांनी नकली ग्राहक बनून 1 कोटी 30 लाख रुपयाचे व्यवहार ठरविला. मात्र हे ग्राहक नसून पोलीस असल्याचे या रक्तचंदन विक्रेत्यांच्या लक्षात येताच त्यांनी आपल्या वॅगनर मारुती कार (एम.एच 03 बीसी 3598) मधून पळ काढला. त्यावेळी माणगाव पोलिसांनी त्यांचा माणगाव ते इंदापूर असा 10 किमीचा पाठलाग करीत इंदापूर येथील बाजारपेठेत नागरिकांच्या मदतीने कार अडविली आणि 3 आरोपींना शिताफीने पकडण्यात यश आले. त्यांच्या कडून 40 किलो रक्त चंदन सदृश्य माल ताब्यात घेतला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीष अस्वर, पोलीस हवालदार पोळेकर, पोलीस कॉ. शाम शिंदे, शाम डोईफोडे, अमोल पोंदे, गोविंद तलवारे, दिपाली मोरे, यांनी या आरोपींना इंदापूर येथे पकडले. यात सुनील प्रेमचंद पटवा ,शारीक खान आणि इम्रान शेख सर्व रा.मुंबई अशी त्याची नावे आहेत. याना माणगाव पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. माणगाव वनविभाग भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version