क्रिकेट स्पर्धेत गांगेश्‍वर संघाचे जेतेपद

| मुंबई | प्रतिनिधी |

श्री देव रवळनाथ क्रिकेट संघ वायंगणी (मालवण), मुंबई, या मंडळाने ग्रामस्थांना एका प्रवाहात आणण्यासाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजन श्रमिक जिमखाना मैदान, ना.म. जोशी मार्ग, मुंबई येथे करण्यात आले होते. त्यात 300 हुन अधिक वायंगणी ग्रामस्थ तरुण खेळाडूंनी सहभाग घेतला. बाबू राणे, हरिश्‍चंद्र सावंत, समेंद्र सावंत व मंगेश सावंत यांनी या स्पर्धा यशस्वी करण्याकरीता अथक परिश्रम घेतले. या स्पर्धेचा अंतिम सामना गांगेश्‍वर क्रिकेट संघ विरुद्ध पावणाई क्रिकेट संघ या संघांमध्ये झाला. या मध्ये गांगेश्‍वर क्रिकेट संघ अंतिम विजयी ठरला. पावणाई क्रिकेट संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.अंतिम सामन्यातील सामनावीर चेतन सावंत, सर्वोत्कृष्ट गोलंदाज प्रदीप सावंत, सर्वोत्कृष्ट फलंदाज आतिश सावंत, मालिकावीर ऋषिकेश सावंत यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Exit mobile version