| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्यातील नाते संपुष्टात आले. पुढील मोसमासाठी लवकरच महालिलाव होणार आहे. त्याअगोदर दिल्ली संघाने पाँटिंग यांना निरोप दिला आहे. गेली सात वर्षे पाँटिंग दिल्ली संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. 2008 पासून आयपीएलमध्ये खेळणाऱ्या दिल्लीला आजपर्यंत विजेतेपद मिळवता आलेले नाही. दरम्यान, सौरव गांगुली संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक बनू शकतो, अशा बातम्या येत होत्या. तो सध्या डीसीचे क्रिकेट संचालक आहे. आता सौरव गांगुलीला याबाबत विचारण्यात आले. पाँटिंगला हटवण्याच्या कारणासोबतच त्याने पुढील मुख्य प्रशिक्षकाचे नावही उघड केले. सौरव गांगुली म्हणाला की, मला पुढच्या वर्षीच्या आयपीएलची योजना आखायची आहे. पुढील वर्षी मेगा लिलाव आहे, त्यामुळे मी आतापासूनच तयारी सुरू करत आहे. कारण मला डीसीला आयपीएलचे विजेतेपद जिंकायचे आहे. पॉन्टिंग गेल्या 7 वर्षांत डीसीला पुढे नेऊ शकला नाही. मला फ्रँचायझींशी बोलावे लागेल आणि त्यांना भारतीय प्रशिक्षकाचा विचार करण्यास सांगावे लागेल. पाँटिंगची जागा कोण घेऊ शकते, असे गांगुलीला विचारले असता तो म्हणाला, मी मुख्य प्रशिक्षक असेल. बघू मी कशी कामगिरी करतो. मला काही नवीन खेळाडूही आणावे लागतील.






