| पनवेल | वार्ताहर |
गांजा विक्री करणाऱ्या एका इसमास एनआरआय पोलिसांनी उलवे परिसरातून गस्तीच्या वेळी ताब्यात घेतले. त्याच्याकडून अठरा हजार रुपये किमतीचा गांजा हस्तगत केला आहे. पोलिसांचे पथक उलवे परिसरात गस्त घालत असताना एक इसम त्यांना पाहून पळून जात असता या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या बॅगेची झडती घेतली असता अठरा हजार रुपये किमतीचा गांजा मिळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.