गांजा विक्रेता गजाआड

| चणेरा | प्रतिनिधी |

रोहा शहरातील खालचा मोहल्ला मुस्लिम कब्रस्तानजवळ जामा मशीद रोडवर अरबाज अहमद बडे (24) रा. खालचा मोहल्ला हा गांजा विकत असल्याची माहिती रोहा पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.आर. रावडे, पोलीस हवालदार म्हात्रे, अनिल पाटील यांनी सापळा रचून गांजा विकणार्‍या अरबाज अहमद बडे या आरोपीच्या रोहा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपीकडून 550.50 ग्रॅम वजनाचा काळ्या रंगाच्या पिशवीत ठेवलेला गांजा जप्त केला आहे. या गांजाची किंमत 8500 रुपये इतकी आहे.

Exit mobile version