मुरुडमध्ये गणपती कारखाने सुरू

। मुरुड । वार्ताहर ।
मुरुडमध्ये शाडूच्या मातीच्या गणपती मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कोरोनाचे संपूर्ण नियम पाळून मुरुडमधील गणपती कारखाने सुरू करण्यात आले आहेत.

पूर्वपरंपरेने येथील गावकरी शाडूची गणपती मूर्ती पूजनासाठी वापरतात. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना फार कमी प्रमाणात मागणी असते. याने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होते. शाडूची माती गुजरात येथून मागवली जाते. गतवर्षीच्या तुलनेत मातीच्या किंमती ठाम असून डिझेल वाढ झाल्याने ट्रान्सपोर्टचा खर्च वाढला असल्याचे मुरुड मधील गणपती कारखानदार विजय उर्फ भाऊ भगत यांनी सांगितले. गणपतीसाठी लागणारी शाडूची माती व रंग यांचा ट्रान्सपोर्ट खर्च वाढल्याने मूर्तीच्या किमतीत थोडीफार वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे व विजेच्या लपंडावामुळे गणपतींचे साचे व मूर्ती बनविण्यास लवकरच सुरवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टसिंग राखून व सुरक्षिततेबाबत सर्व नियम पाळून कारखाना सुरू केल्याचे कारखानदारांनी सांगितले.

Exit mobile version