| कोलाड | वार्ताहर |
इंदापूर येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात येत आहे. या कचऱ्यामुळे या महामार्गवरून ये-जा करणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
इंदापूर येथील मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढीग साचत असुन, या मार्गावर सहन न होणारी दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे डेंगू, मलेरियासह इतर आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. या महार्माच्या परिसरातील बाजारपेठेतून घंटा गाडी घनकचरा अचलते. परंतु, हा कचरा टाकण्यासाठी जागा नसल्यामुळे हा कचरा मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्यालगत टाकला जातो. त्यामुळे संबंधितांनी या कचऱ्याचे योग्य त्या ठिकाणी व्यवस्थापन करून कचऱ्याची विल्हेवाट लावून योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशी वर्गासह स्थानिकांकडून केली जात आहे.
महामार्गावरील कचऱ्यामुळे आरोग्य धोक्यात
