खारघरमध्ये कचर्‍याचे ढीग

नागरिकांमध्ये नाराजी
। पनवेल । वार्ताहर ।
खारघर वसाहतीत हिवताप, डेंग्युच्या आजारामध्ये वाढ होत असताना पनवेल महापालिकेकडून सिडकोच्या राखीव भूखंडावर टाकण्यात येत असलेला कचरा वेळेवर उचलला जात नाही. त्यामुळे कचर्‍याच्या ढिगार्‍यातून पसरणार्‍या दुर्गंधीमुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
पनवेल महापालिका आरोग्य विभागाकडून परिसरातील कचरा घंटागाडी द्वारे गोळा करुन पेठपाडा मेट्रो स्थानकालगत असलेल्या सिडकोच्या राखीव भूखंडावर टाकला जातो. त्यानंतर तो कचरा वाहन अथवा घंटागाडी द्वारे घोट येथील डम्पिंग ग्राऊंड याठिकाणी नेला जातो. मात्र, सदर कचरा महापालिकेकडून वेळेवरच उचलला जात नसल्यामुळे कचर्‍यातून पसरणार्‍या दुर्गंधीमुळे सेक्टर- 34, 35 आणि जवळच असलेल्या ओवापेठ मधील रहिवासी त्रस्त झाले आहेत. याविषयी महापालिकेच्या घंटागाडीचे काम पाहणारे राजेंद्र गोसावी यांच्याशी संपर्क केला असता, नंतर फोन करतो असे सांगून त्यांनी फोन कट केला.

Exit mobile version