| पिंपरी | वृत्तसंस्था |
घरगुती वापराच्या सिलेंडरमधून गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात पाचजण जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि. 21) पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास पिंपरीतील बौध्दनगर परिसरात घडली आहे. मनोज कुमार (19), धीरज कुमार (23), गोविंद राम (28), राम चेलाराम (40), सत्येंदर राम (30), सर्व रा. बौद्धनगर, बिल्डींग नं. १६ च्या मागे, पिंपरी अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहे.
अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, स्फोटात जखमी झालेले सर्वजण पिंपरीतील बौध्दनगर परिसरात एकाच खोलीत राहतात. सकाळी साडेपाचच्या सुमारास स्वयंपाक करण्यासाठी एकाने गॅस पेटवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोठा स्फोट होऊन घरातील सर्वजण जखमी झाले. याबाबत माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जखमींना पिंपरी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.