| पनवेल | प्रतिनिधी |
कामोठे सेक्टर 34 परिसरात सुरू असलेल्या जलवाहिनीच्या खोदकामादरम्यान गॅस वाहिनीला धक्का लागून वायूगळती झाली. या घटनेत कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. मात्र, काहीवेळ परिसरात भीतीचे वातावरण होते. मात्र अग्निशमन दल, पोलीस आणि गॅस कंपनीच्या आपत्कालीन पथकाने तत्परतेने परिस्थिती नियंत्रणात आणली. गळतीची माहिती मिळताच कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे आणि पथकाने नागरिकांना घटनास्थळापासून सुरक्षित अंतरावर नेले.






