वायुगळती रोखण्यास यश
| खोपोली | प्रतिनिधी |
पुणे-सोलापूर-कर्नाटकाच्या दिशेने O2 गॅस वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघात झाला. त्या ठिकाणी अतिज्वलनशिल वायूची गळती होण्याची शक्यता होती. असा प्रकार झाल्यास एखादी गंभीर दुर्घटना होण्याची भीती होती. ती घटना रोखण्यासाठी एचपीसीएल व्यवस्थापनाने अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेची मदत घेण्याचे ठरवले. परंतु खोपोलीहून त्या ठिकाणी जाऊन वायुगळती रोखण्यासंदर्भात काम करण्यासाठी घटनास्थळी पोहोचताना खूप उशीर होणार होता.
धनंजय गीध, हनिफ कर्जीकर, अमोल कदम आणि अजून काही सदस्यांनी सर्व संसाधनांसह तेथे जाण्याची तयारी देखील केली होती. मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन धनंजय गीध यांनी तेथून जवळच असलेल्या यंत्रणेला याठिकाणी पाठवून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करत वायू गळती होऊ न देता वाहन व्यवस्थित उभे केले.
अपघातग्रस्त दोन्ही वाहने सुरक्षित ठिकाणी बाजूला उभी केली असून त्या मार्गावरील वाहतूक आता सुरळीत सुरू झाली आहे. तेथील पोलिस प्रशासनाने आणि एचपीसीएल कंपनीने अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सहकार्यासाठी आभार मानले आहेत.