माथेरानमध्ये धनगर समाजाचा मेळावा

| माथेरान | वार्ताहर |

विजयादशमीच्या शुभदिनी कर्जत तालुक्यातील धनगर समाजाचा मेळावा माथेरान धनगर समाजाचे शहर अध्यक्ष दीपेश ढेबे, श्री पिसारनाथ उत्सव कमिटी अध्यक्ष गणेश गोरे, संगीता रामचंद्र ढेबे यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. यावेळी अहिल्याबाई होळकर चौकातून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. या मिरवणुकीत कर्जत तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने हजर होते. येळकोट येळकोट जयमल्हारच्या घोषणा देत ढोलताशांच्या गजरात श्रीराम चौक येथे धनगरी नृत्याविष्कार दाखवत ही मिरवणूक पिसारनाथ मंदिराकडे निघाली. या मिरवणूकीत समाजबांधवांच्या पारंपरिक गजानृत्याने सर्व पर्यटकांचेही लक्ष वेधून घेतले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राकेश कोकळे, प्रवीण बावदाने, करण जानकर, तालुकाध्यक्ष तुकाराम आखाडे यांनी विशेष मेहनत घेऊन या मेळावा यशस्वी केला.

Exit mobile version