बेरोजगार युवकांचा मेळावा

| उरण । वार्ताहर ।

जेएनपीटी टाऊनशिप येथे युवकांच्या नोकर्‍या संदर्भात एका महत्वाच्या बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. कॉ.भूषण पाटील, सुधाकर पाटील, संतोष पवार, दिनेश घरत, राजेंद्र मढवी, प्रमोद ठाकूर, जितेंद्र ठाकूर, शेखर पाटील, चेतन गायकवाड, प्रा. राजेंद्र मढवी, प्रा.एल.बी.पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या बैठकीत स्वामी विवेकानंद जयंती निमित्त राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून 12 जानेवारी रोजी मल्टीपर्पज हॉल, टाऊनशिप, उरण येथे दुपारी 3 वाजता बेरोजगार युवकांचा मेळावा घेण्याचा निर्धार करण्यात आला. तरी जास्तीत जास्त बेरोजगार युवकांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन एल.बी. पाटील यांनी केले आहे.

Exit mobile version