| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
माणगाव डी. एड. कॉलेजच्या 1982- 83 बॅचच्या 18 विध्यार्थीनी स्नेहमेळाव्यासाठी रविवारी दि. 28 रोजी तब्बल 40 वर्षांनी महाड शहरात एकत्रित आल्या होत्या. स्नेहमेळावा विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. मेळाव्याचे मानसी धाटावकर, परिणिता वनारसे, प्रज्ञा गुरव, उषा कांबळे, मेघा साठे- ओंजळे यांनी मेळाव्याचे उत्तमपणे नियोजन करीत सर्वाचे स्वागत केले. प्रारंभी गणेश व सरस्वती पूजन करण्यात आले. सर्वांचा कौटुंबिक परिचय करून देण्यात आला.
सामाजिक बांधिलकी म्हणून या 18 – मैत्रिणींनी 5000 रुपयांची देणगी महाड जवळील राजेवाडी येथील स्वराज्य निवारा वृद्धाश्रमाला देऊन वृद्ध आजी-आजोबा प्रति बांधिलकी देखील जपली. यावेळी नीता साडविलकर, प्रज्ञा सद्रे, मेधा ओंजाळे, मानसी धाटावकर, परिणिता वनारसे, पूजा सुळे, माधुरी डफळ, स्वाती राजपुरकर, जोसना मेहता, विमल चव्हाण, उषा कांबळे, प्रविता माने, नयना कांबळी, सुप्रिया राजमाने, शरयू आधिकारी, विजया उकिरडे, रेखा मुंडे, प्रज्ञा गुरव उपस्थित होत्या.