| ठाणे | प्रतिनिधी |
महाराष्ट्र गतका संघाने राष्ट्रीय गतका स्पर्धेमध्ये देदीप्यमान यश मिळवत पदकांची लयलूट केली आहे. चंदीगड मोहालीमध्ये नुकतीच ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाने पाच रजत आणि तीन कांस्यपदक पटकावले. राष्ट्रीय गतका स्पर्धेमध्ये भारतातील 23 राज्यातील सहाशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. विजेता खेळाडूंबरोबरच उपांत्य फेरीमध्ये पोहोचलेले जवळपास 10 खेळाडू हे स्पोर्ट्स थॉरिटी ऑफ इंडियाच्या खेलो इंडिया लीग स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. श्रीधर कमले यांनी प्रशिक्षक पदाची जबाबदारी पार पाडली. या सर्व संघाचे चंदिगड येथे नेतृत्व असोसिएशन ऑफ गतका, महाराष्ट्राचे सचिव प्राध्यापक आरती चौधरी यांनी केले. व महाराष्ट्र संघासाठी पदक जिंकण्यास मुलांचे प्रोत्साहन वाढविले. असोसिएशन ऑफ गतका महाराष्ट्राचे अध्यक्ष संतोष चौधरी, उपाध्यक्ष अश्विनी महांगडे, खजिनदार सायली जाधव आणि सर्व सभासद यांनी सर्व संघाला शुभेच्छा दिल्या.






