| चिरनेर | वार्ताहर |
वीर वाजेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी गौरव जगदीश ठाकूर या विद्यार्थ्याने अंबरनाथ या ठिकाणी पार पडलेल्या विद्यापीठस्तरीय एअर पिस्टल नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक, तर मुंबई शहर विभागाच्या चार विद्यार्थ्यांच्या संघाने त्याच्या नेतृत्वाखाली सुवर्णपदक पटकाविले. या चमकदार कामगिरीमुळे तो राष्ट्रीयस्तरीय भारतातील सर्व विद्यापीठांच्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
गौरव सध्या महाविद्यालयात तृतीय वर्ष वाणिज्य या वर्गात शिकत आहे. चिरनेर गावातील जगदीश ठाकूर यांचा हा सुपुत्र आहे. यावर्षी आमदाबाद गुजरात या ठिकाणी संपन्न झालेल्या दहा मीटर जुनियर नेमबाजी प्रकारात गौरव राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. त्याच्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल माजी आ. बाळाराम पाटील, उपाध्यक्ष पी.जे. पाटील, भावना घाणेकर, सुधीर घरत, प्रा.डॉ. पी.जी. पवार तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. उपप्राचार्य व जिमखाना प्रमुख डॉ. व्ही.एस. महाले व प्रा. देवेंद्र कांबळे यांचे त्याला सरावासाठी मार्गदर्शन केले.







