गौतमी घरत, तनिष्क आपणकरने पटकावला करंडक

ग्रामीण रंगभूमी प्रभा करंडक एकपात्री स्पर्धा

। अलिबाग । प्रतिनिधी ।

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 7 जुलै रोजी पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळ अंतर्गत ग्रामीण रंगभूमीच्या वतीने स्थानिक ग्रामीण भागातील कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रभा करंडक 2024 एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मोठ्या गटात गौतमी घरत हिने, तर लहान गटात तनिष्क आपणकरने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत एक 42 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन करण्यात आले.


याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेत्री विजया कुडव, स्पर्धेचे परीक्षक लेखक, दिग्दर्शक, अभिनेते रवि वाडकर आणि भास्कर पाटील, दिग्दर्शक किशोर म्हात्रे, अभिनेते सागर नार्वेकर, अभिनेते योगेश पवार, कीर्तनकार संतोष बोंद्रे, प्रकाश कवळे, सुनील धुमाळ, के.डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सदर एकपात्री स्पर्धा ही अलिबाग, मुरुड, रोहा, पेण आणि उरण तालुक्यातील ग्रामीण (ग्रामपंचायत) भागातील कलाकारांसाठी मर्यादित होती. या स्पर्धेत लहान आणि मोठा गट अशा एकूण 42 स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत मोठ्या गटाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस रु. 7000/-आणि प्रभा करंडक गौतमी घरत हिने पटकावला, तर लहान गटाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस रु. 5000/- आणि प्रभा करंडक तनिष्क आपणकर हिने पटकावला.

बक्षीस समारंभाप्रसंगी मान्यवर परीक्षक रवि वाडकर आणि भास्कर पाटील यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. ग्रामीण रंगभूमीचे अध्यक्ष राजन पांचाळ यांनी ग्रामीण रंगभूमीच्या पुढील वाटचाल आणि उपक्रमाची उपस्थितांना माहिती दिली. विक्रांत वार्डे यांनी सदरची एकपात्री स्पर्धा ज्येष्ठ अभिनेत्री कै. लिना ठोंबरे यांच्या स्मृतीस समर्पित केल्याचे जाहीर केले. याप्रसंगी सुनील ठोंबरे, प्रकाश सप्रे, प्रकाश पाटील, आरती पाठक, अश्रीता बारसे, राजू झावरे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ निवेदक आणि ग्रामीण रंगभूमीचे उपाध्यक्ष देवेंद्र केळूसकर यांनी केले. त्यांना तन्वी पाटील-पानकर यांनी साथ दिली. ग्रामीण रंगंभूमी चे सचिव प्रतिक पानकर यांनी निकाल जाहीर करुन उपस्थितांचे आभार मानले.

या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनाचे कामासाठी ग्रामीण रंगंभूमीचे पदाधिकारी संकल्प केळकर, मयूर शिंदे, जितेंद्र पाटील, तुषार पाटील, राजू गुरव, राजू झावरे यांनी मोलाचे योगदान दिले. त्याचप्रमाणे निशिकांत कोळसे, दिनेश पाटील, दीपक काळेल, साहील राऊत, आयान बेलोस्कर, अनिष मिठागरी, वरद ठाकूर, हर्षाली सानप, श्रुती टावरी, स्फूर्ती खेऊर, सुबोध पाटील, प्रितेश पाटील यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केल्याबद्दल पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह तथा शेकाप महिला आघाडी रायगड जिल्हा प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी सर्वांचे मनापासून कौतुक केले.

मोठा गट विजेते
प्रथम क्रमांक गौतमी घरत, द्वितीय क्रमांक सुधीर सावंत, तृतीय क्रमांक स्वप्नाली मोरे, उत्तेजनार्थ कृतीका पाटील, विशेष प्रमाणपत्र तनिष्का नागे, आदेश पवार, श्रीया साखीरकर यांना गौरविण्यात आले.
लहान गट विजेते
प्रथम क्रमांक तनिष्क आपणकर, द्वितीय क्रमांक आराध्य पाटील, तृतीय क्रमांक श्रावणी सुतार, उत्तेजनार्थ अनन्या प्रमाणे, विशेष प्रमाणपत्र स्मंद कोठेकर, विरा नरबेकर यांना गौरविण्यात आले.
चित्रलेखा पाटील यांच्याकडून कौतुक
ग्रामीण भागातील कलाकार पुढे आले पाहिजेत, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळाले पाहिजे या संकल्पनेतून प्रभा करंडकाचे यशस्वी आयोजन करण्यात आल्याबद्दल चित्रलेखा पाटील यांच्याकडून सर्वांचे कौतुक करण्यात आले. तसेच यापुढेही अशाच पद्धतीने स्पर्धा व्हाव्यात, यासाठी सर्वार्थाने मदत करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले.

चित्रलेखा पाटील यांच्या संकल्पनेतून ग्रामीण रंगभूमीची स्थापना करून आमचे सर्वांचे प्रेरणास्थान आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामीण भागातील कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रभा करंडक 2024 एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन केले, त्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. या ग्रामीण नाट्य चळवळीच्या वाटचालीस शुभेच्छा देताना चित्रपट दिग्दर्शक आणि संगीतकार विक्रांत वार्डे, ग्रामीण रंगभूमीचे अध्यक्ष राजन पांचाळ यांचे अभिनंदन करून त्यांना या कार्यात सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.

अ‍ॅड. मानसी म्हात्रे,
माजी नगराध्यक्ष
Exit mobile version