पेणमध्ये गावठी हातभट्टी दारू जप्त

| पेण | प्रतिनिधी |

हातभट्टीची दारू स्वस्थ असल्याने ग्रामीण भागात सर्रास हातभट्टीच्या दारूची विक्री केली जाते. आज वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी हातभट्टीची दारू तयार केली जाते. मात्र पोलीस खाते याकडे दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात असल्याने दारू विक्रेत्यांचा धाडस वाढलेले आहे. वडखळ पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई केली; परंतु ही कारवाई निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केल्याचे बोलले जात आहे. निवडणुका झाल्यावर परत ये रे माझ्या मागल्या अशी स्थिती नाकारता येणार नाही. यावरून एक गोष्ट निश्‍चित की, ही कारवाई म्हणजे फक्त देखावा आहे.

पेण तालुक्यातील निगडे येथे हिरामण पांडुरंग नाईक, रा. निगडे, पो. आमटेम, ता. पेण यांनी रू 2700/- किमतीची आठ लीटर गावठी हातभट्टीची तयार दारू बाळगल्याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार आतिश गायकवाड यांनी फिर्याद दाखल केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, वडखळ पोलीस ठाणे हद्दीतील निगडे येथे हिरामण नाईक यांच्या घरासमोर असलेल्या आंब्याच्या झाडाजवळ मोकळ्या जागेत, पेण हिरामण पांडुरंग नाईक याने शासनाने प्रतिबंधित केलेली गावठी हातभट्टीची तयार दारू स्वत:चे ताबे कब्जात एकूण 2,700/। रूपये किमतीचे बाळगले स्थितीत मिळून आला. याबाबत वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास महिला पोलीस हवालदार गीता गंगेश धुपकर हे करीत आहेत.

पालखार येथे हिरामण मोतीराम म्हात्रे पालखार, ता. पेण यांनी रू 2400/- किमतीची नऊ लीटर गावठी हातभट्टीची तयार दारू बाळगल्याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार प्रशांत प्रकाश देशाई यांनी फिर्याद दाखल केली आहे. निगडे येथे हिरामण म्हात्रे यांचे घराच्या पाठीमागे पश्‍चिमेस आंब्याच्या झाडाखाली आरोपी याने शासनाने प्रतिबंधित केलेली गावठी हातभट्टीची तयार दारू स्वत:चे ताबेकब्जात एकूण 2700/। रूपये किमतीचे विनापरवाना बाळगल्याच्या स्थितीत मिळून आला. याबाबत वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास महिला पोलीस हवालदार चवरकर ा करीत आहेत.

Exit mobile version