| खांब | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील धानकान्हे येथील गावदेवी क्रीडा मंडळ धानकान्हे यांच्या वतीने व खांब क्रिकेट असोसिएशनच्या सहयोगाने संपन्न झालेल्या विभागीय क्रिकेट स्पर्धेत धाक्सुद चिल्हे या संघाने अंतिम सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करून गावदेवी धानकान्हे चषकावर आपले नाव कोरले. पांडुरंग कचरे, महादेव माहीत, प्रदीप जाधव, सुनील जंगम, दिलीप कचरे, सुशिल साबले, राकेश थळकर, नरेश कचरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत विभागातील नामाकिंत संघांनी सहभाग घेतला होता. रॉयल किंग शिरवली या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तृतीय क्रमांक भाई भाई खांब या संघाने पटकावले. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून संकेत लहाने शिरवली, उत्कृष्ट फलंदाज विजय खामकर खांब तर सामनावीर म्हणून अमर महाडिक चिल्हे याला देण्यात आला.
सर्व विजयी संघांना सूरज कचरे, प्रदीप माहित, चंदू गोसावी, महेश कचरे, पांडुरंग हळदे, निलेश टवळे, मनोज थिटे, अजय भोसले आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या सामन्याचे समालोचन विश्वास जाधव व सचिन जाधव यांनी केले. तर सामने यशस्वी करण्यासाठी गावदेवी क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.
गावदेवी क्रिकेट स्पर्धा; धाक्सुद चिल्हे विजयी
