ग्रामीण रुग्णालयात महाआरोग्य शिबीर

| कोर्लई । वार्ताहर ।
संकल्प निरोगी महाराष्ट्राचा अंतर्गत मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात शहरातील लेडिकुलसूम बेगम हॉस्पिटलमध्ये आयोजित महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुरुवातीला सर्व उपस्थितांचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.उषा चोले यांनी स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.सदर आरोग्य शिबिरात बाल आरोग्य तपासणी,जागृत पालक सुदृढ बालक या योजनांचा शुभारंभ सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मकबुल कोकाटे मान्यवरांच्या हस्ते फित कापून करण्यात आला.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. निशिगंधा माळी यांनी आरोग्य योजनांची माहिती दिली. सदर शिबिरामध्ये नेत्ररोग चिकित्सा, दंतरोग चिकित्सा, रक्ताच्या तपासण्या व गरजूंना औषध वाटप करण्यात आले.

यावेळी सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मकबुल कोकाटे, विजय सुर्वे, आदेश दांडेकर,डॉ.आदित्य वने,वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते.या शिबिराला शहरातील नगरपरिषद प्राथमिक शाळेतील शालेय विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विठ्ठल शिंदे यांनी केले.

Exit mobile version