पांढर्‍या कांद्याला भौगोलिक नामांकन

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या अलिबागला आता पांढर्‍या कांद्यामुळे नवी ओळख मिळणार आहे. या कांद्याला भौगोलिक नामांकन मिळाले आहे. केंद्र सरकारच्या मुंबई येथील पेटंट नोंदणी कार्यालयामार्फत पडताळणी करून मानांकन बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आहे.

मुंबईलगत असलेल्या अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारे हे पर्यटकांचे आकर्षण बनले आहेत. यामुळे अलिबाग तालुक्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली असून, याच तालुक्यात पिकणारा ‘कांदा’ हादेखील प्रसिद्ध आहे. अलिबाग तालुक्यातील बहुतांश भागात शेती केली जाते, तर पूर्व भागातील काही गावांमध्ये कांद्याचे पीक घेण्यात येते. यामध्ये तालुक्यातील नेहुली, खंडाळे, कार्ले, वाडगाव येथे पांढर्‍या कांद्याचे उत्पादन घेण्यात येते. तर, या परिसरात पिकणार्‍या या कांद्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत.

त्यामुळे अलिबागच्या पांढर्‍या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळावे, अशी मागणी करण्यात येत होती. त्यासाठी कृषी विभाग, कोकण कृषी विद्यापीठ, ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी यांच्यात याबाबत एक करार करण्यात आला होता. तर, जानेवारी 2019 रोजी पांढर्‍या कांद्याच्या भौगोलिक मानांकनासाठी नोंदणी करण्यात आली होती. तसेच परिसरातील शेतकरीदेखील याची मागणी सातत्याने करत होते.

याबाबत गेली अनेक वर्षे शासन स्तरावर प्रयत्न सुरू होते. त्यासाठी कृषी विभाग, कोकण कृषी विद्यापीठ, ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी यांच्यात याबाबत एक करार करण्यात आला होता. 15 जानेवारी 2019 रोजी पांढर्‍या कांद्याच्या भौगोलिक मानांकनासाठी नोंदणी करण्यात आली होती. अलिबाग पांढरा कांदा उत्पादन संघही स्थापन करण्यात आला होता. मुंबई येथील केंद्र सरकारच्या पेटंट नोंदणी कार्यालयात 29 सप्टेंबर 2021 रोजी पांढर्‍या कांद्याच्या भौगोलिक मानांकन प्रस्तावाची पडताळणी करण्यात आली. यावेळी कृषी विद्यापीठाच्या भौगोलिक निर्देशांक विभागाचे प्रमुख जितेंद्र कदम, कल्पेश पाटील, जीएमजीसीचे प्रमुख गणेश हिंगमिरे आणि शेतकरी उत्पादक संघाचे शेतकरी सदस्य उपस्थित होते. या बैठकीत अलिबागच्या पांढर्‍या कांद्याला भौगौलिक मानांकन बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या मानांकनामुळे अलिबागच्या पांढर्‍या कांद्याला स्वत:ची ओळख मिळेल, त्याची नाममुद्रा झळकेल आणि ग्राहकांची फसवणूक थांबेल, असा विश्‍वास व्यक्त केला जातो आहे.

प्रस्तावाची पडताळणी
केंद्र सरकारच्या मुंबई येथील पेटंट नोंदणी कार्यालयात पांढर्‍या कांद्याच्या भौगोलिक मानांकन प्रस्तावाची पडताळणी करण्यात आली. या बैठकीत अलिबागच्या पांढर्‍या कांद्याला भौगोलिक मानांकन बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या मानांकनामुळे अलिबागच्या पांढर्‍या कांद्याला स्वतःची ओळख मिळणार आहे. अलिबाग तालुक्यातील नेहुली, खंडाळे, कार्ले, वाडगाव येथे पांढर्‍या कांद्याचे उत्पादन होते. भात कापणीनंतर जवळपास 200 ते 250 हेक्टरवर या कांद्याची लागवड केली जाते. रुचकर आणि औषधी गुणधर्मामुळे हा कांदा प्रसिद्ध आहे. शेतकर्‍यांनी या कांद्याचे शुद्ध बियाणे संवर्धित केले आहे. या कांद्याच्या लागवडीचे ऐतिहासिक दाखलेही 1883 सालच्या कुलाबा राजपत्रात पाहायला मिळतात. त्यामुळे अलिबागच्या पांढर्‍या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळावे, अशी जोरकस मागणी सुरू होती़.

अलिबागच्या पांढर्‍या कांद्याला मानांकन मिळाल्याने तालुक्याबाहेरुन येणार्‍या पांढर्‍या कांद्यावर बंधन येईल. शेतकर्‍यांना फायदा होईल. त्यामुळे शेतकरी जास्त मेहनत घेऊन अधिक उत्पादन काढण्यावर निश्‍चितच आता भर देईल. ग्राहकालासुद्धा चांगला माल मिळेल. त्याची फसवणूक होणार नाही.

जयेश पाटील, कांदा उत्पादक शेतकरी, कार्ले-अलिबाग
Exit mobile version