| महाड | प्रतिनिधी |
खरीप हंगामाची पुर्व तयारी सुरू झाली असुन खरिप हंगाम विशेष पंधरवडा मोहिम अंतर्गत बीजप्रक्रिया व उगवण क्षमता कार्यक्रम नुकताच वडघर येथे घेण्यात आला. त्यावेळी शेतकर्यांना मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी भरत कदम यांनी उत्पादनाची वाढ करण्यासाठी बीज प्रक्रिया महत्त्वाची असल्याचे सांगून ग्रामबिजोत्पादन विषयचे महत्त्व उपस्थित शेतकर्यांना समजावून सांगितले. मंडळ कृषी अधिकारी बिरवाडी वैभव जाधव यांनी बीजप्रक्रिया महत्त्व व प्रात्यक्षिक करून दाखविले. तर कृषी पर्यवेक्षक दत्तात्रय नरूटे यांनी बियाणे उगवण क्षमता विषयी माहिती दिली व प्रात्यक्षिक करून दाखविले कृषि सहाय्यक सतीश चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी टी एल देशमुख , सुभाष चौधरी सरपंच, महिला,शेतकरी, शिवाजी जगताप, विकास जगताप, प्रकाश जगताप, बालाजी पवार, शंकर पवार तसेच तालुक्यात अंबेशिवथर, वाकी खुर्द, करंजाडी,रेवतळे,गावडी,नागाव,विन्हेरे,दादली, सिरसवणे,वलंग, चिंभावे,भालेकरकोंड,आसनपोई,नाते,चापगाव,माझेरी,वीर,दाभेकरकोंड,किजळोली बु या गावात कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्यामार्फत कार्यक्रम घेण्यात आले.