अनिल नवगणे यांचे कार्यकर्त्यांना आदेश
| म्हसळा | वार्ताहर |
लोकसभा आणी विधानसभा निवडणूक एकत्र लागण्याची शक्यता असल्याने तसेच ग्रामपंचायत निवडणुकीचा आरक्षण कार्यक्रम जाहीर झाल्यानें येत्या दोन महिन्यात निवडणुका लागू शकतात, त्यामुळे सर्व पदाधिकारी आणी कार्यकर्त्यांनी तयारीला लागा, असे आदेश शिवसेना (उबाठा) दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या पदाधिकारी आणी कार्यकर्ते यांच्या आढावा बैठकीत दिले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची म्हसळा येथे जाहीर सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी माझी उमेदवारी जाहीर केली. या सभेला झालेली गर्दी पाहून माझी जबाबदारी वाढली आहे. श्रीवर्धन मतदार संघातील मुस्लिम समाज तसेच इतर सर्व समाज संपूर्णपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पाठीशी असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपला विजय नक्की होणार असल्याचे नवगणे यांनी या आढावा बैठकीत बोलताना सांगितले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख नंदू शिर्के, महिला आघाडी जिल्हा संघटक स्वीटी गिरासे, तालुका प्रमुख सुरेश कुडेकर, उपतालुका प्रमुख राजाराम तीलटकर, शहरप्रमुख अनिकेत पानसरे, रीमा महामुनकर, शौकत हजवाने, नदीम दफेदार, नजीर कादरी, सुजित येळवे, दीपल शिर्के, बाळा म्हात्रे, निशा पाटील, अखलाक काठेवाडी आणी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.