| मुरुड | प्रतिनिधी |
ललित कला फाऊंडेशन ठाणे तर्फे उगवत्या गझलकारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध ठिकाणाहून स्वतः बनवलेल्या गझल मागवण्यात आल्या होत्या. यामधून या संस्थेस विविध ठिकाणाहून गझल प्राप्त झाल्या. प्राप्त शंभर गझल मधून मुरुड मधील योगेश महेंद्र दवटे यांची “ गझल सम्राट सुरेश भट पुरस्कार 2023 करीत निवडलेल्या गझलांमध्ये योगेश यांच्या लिहिलेल्या गझलेला “ गझल विशेष सन्मान पुरस्कार 2023 “ देण्यात आला. यावेळी गायक व संगीतकार डॉ. कुणाल इंगळे यांच्या शुभ हस्ते योगेश दवटे यांना गौरवण्यात आले. यावेळी ललित कला फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मण शिवणेकर, भागवत बनसोडे, प्राध्यापक संजय घरडे, गझलकार सुनील ओव्हाळ, कवी व गझलकार काशिनाथ महाजन, रंगकर्मी व गझलकार श्रीनिवास गडकरी, आदी मान्यवर उपस्थित होते.
मुरुड मधील योगेश दवटे हे मुंबई मधील लोअर परेल ललॉईड इंजिनीरिंग वर्क्स लिमिटेड येथे प्रोजेक्ट इंजिनिअर म्हणून काम करीत आहेत. फावल्या वेळेत तें गझल व गीत बनवतात. त्यांना लहानपणापासून गीताची आवड होती. नोकरी करीत असताना ते आपला छंद जोपासत आहेत. 2021 मध्ये लिहिलेलं आणि आदर्श शिंदे यांच्या आवाजात रेकॉर्ड झालेलं मन झुरु लागलं हे गाणं योगेश दवटे याने लिहिलेलं आहे. 2022 मध्ये लखाबाय पोतराज आलाय भेटीला या गाण्याचे गायक चंदन कांबळे यांच्या आवाजात रेकॉर्ड झालेलं आलो तुळजाभवानी भेटीला हे गाणं योगेश दवटे याने लिहिलेलं आहे.







